Thane Namo Job Fair 2024 | ४० हजार पदांच्या ठाणे नमो महारोजगार मेळावा

Thane Namo Job Fair 2024

Thane Job Melava 2024: Thane Namo Job Fair is going to be conducted on 7th March 2024 for various positions. To participate in this Thane Namo Job Fair, candidates should be registered before appearing this office job fair. See More details about this Thane Namo Job Fair 2024 at below:

ठाणे नमो रोजगार मेळावा 7 मार्च 2024 रोजी विविध पदांसाठी आयोजित केला जाणार आहे. या ठाणे नमो जॉब फेअर साठी उमेदवारांनी प्रथम स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे आणि नंतर दिलेल्या ठिकाणी ठाणे नमो जॉब फेअर साठी उपस्थित राहू शकतात.

कोकण  नमो महारोजगार विभागस्तरीय मेळाव्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा आधी 29 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी  होणार  होता. पण काही कारणा मुळे ठाणे महानगर पालिकेने हा मेळावा ७ मार्च रोजी घेण्याचे ठरवले आहे.  हा मेळावा मॉडेला मिल कपाऊंड, वागळे इस्टेट ,चेक नाका ,ठाणे – ४००६०४ येथे होणार आहे, हि माहिती कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.

मंत्री श्री.लोढा बोलले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनातून कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत नोकरी साठी इच्छुक युवक-युवती, तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी  कोकण विभागाने ठाणे, पालघर, रत्नागिरी,रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील नोकरी साठी इच्छुक युवक व युवतींकरिता  ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन केले आहे. या मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोचे देखील  आयोजन करण्यात आले असून ७ मार्च रोजी हा मेळावा सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. या मेळाव्यात नोकरी इच्छुक युवक-युवती यांनी मुलाखतीसाठी आणि महाएक्सपो मध्ये स्टार्टअप्स,इनवेस्टर्स व इनकुबेटर्स  या सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत करण्यात आले आहे.

Steps to Register for the Job Fair:

  1. Mobile Number Verification
  2. Personal Information
  3. Address
  4. Qualification
  5. Apply

या मेळाव्यात दहावी, बारावी,आय.टी.आय., पदविका,पदवीधर,पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेवून  रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत.या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. https://qr-codes.io/gdhSNd   किंवा www.rojgar.mahaswayam.gov.in  या लिंक वर उमेदवार नोंदणी व नोकरीकरिता अर्ज करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. एकापेक्षा अधिक नोकरीसाठी देखील एकाच उमेदवाराला अर्ज करता येवून मुलाखती देत येतील.रोजगार मेळाव्यात सहभागी होणा-या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर ही नोंदणी करणे आवश्यक आहे.जे उमेदवार मेळाव्याच्या अगोदर नाव नोंदणी करतील त्याच उमेदवारांच्या मेळाव्याच्या दिवशी मुलाखती होणार आहेत. या माध्यमातून  दोन लाख युवक आणि युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामुळे सर्व विभागांनी मिळून हा रोजगार मेळावा सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी कसून प्रयत्न करणे आवश्यक आहे.

कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर,रत्नागिरी,रायगड,सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी करून रिक्त पदे अधिसूचित/जाहीर करणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी किंवा 1800 -120 -8040 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Details of Namo Maha Rojgar Melava 2024

Rojgar Malava DetailsPandit Deendayal Upadhyay Employment Fair
Recruitment Bharti DetailsThane Namo Rojgar Melava 2024
Total Vacancies40,000 +
Official Websiterojgar.mahaswayam.gov.in
How To ApplyOnline Application Forms
Recruitment ForPrivate Employer
Job Fair Date6th and 7th March 2024
नोंदणी साठी येथे क्लिक करा

हि माहिती आपल्या मित्र-मैत्रिणी , नातेवाईक यांना शेअर करा. धन्यवाद !

 Thank you for reading. Share this post with your friends or family to know about the job opportunity.

Leave a Comment