OICL Recruitment 2024
OICL Recruitment 2024: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये ऑफीसर पदासाठी विविध पदांच्या रिक्त जागा निघाल्या आहेत. OICL द्वारे अधिकृत जाहिरात अधिसूचना निर्गमित केली आहे.
जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र त्यांना अर्ज करता येणार आहे. एकूण 100 रिक्त जागांसाठी प्रशासकीय अधिकारी [Administrative Officers (Scale-I)] या पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे.
जे उमेदवार पदवीधर असतील त्यांना या भरती साठी खास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पदवीधर असाल तर ही संधी तुमच्यासाठी सुवर्णसंधीच आहे.
उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरतीसाठी फॉर्म भरायचा आहे, ऑनलाईन रित्या सादर केलेले अर्ज घेतले जाणार आहेत. अन्य माध्यमातून सादर करण्यात आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
OICL Recruitment 2024 या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 एप्रिल 2024 आहे. मुदत संपल्यानंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही, त्यामुळे शेवटची तारीख लक्षात घ्या आणि तारीख संपण्यापूर्वी फॉर्म भरून घ्या.
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी ऑफीसर भरती ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, नोकरीचे ठिकाण, वयोमार्यादा, पगार, परीक्षा फी, जागा, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
OICL Recruitment 2024
पदाचे नाव | प्रशासकीय अधिकारी OICL Recruitment 2024 |
पद संख्या | 100 जागा |
शैक्षणिक पात्रता | 60% गुणांसह B.Com/ MBA (Finance)/CA/ICWA/ पदवी (Statistics/ Mathematics/ Actuarial Science) किंवा पदव्युत्तर पदवी (Statistics/ Mathematics/ Actuarial Science) किंवा B.E/B.Tech/M.E/M.Tech (Information Technology /Computer Science/Electronics & Communication/Automobile /Mechanical / Electrical/ Civil/Chemical /Power/ Industrial/ Instrumentation) किंवा MCA किंवा M.B.B.S/BDS किंवा 60% गुणांसह LLB |
वयोमार्यादा | 21 ते 30 वर्षे. |
वयोमार्यादा सूट | SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षांची सूट OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षांची सूट |
परीक्षा फी | UR/EWS/OBC प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये. SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांना 250 रुपये. |
पगार | 85,000 रुपये महिना. |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज स्सुरू होण्याची तारीख | 21 मार्च 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 12 एप्रिल 2024 |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
OICL Bharti Apply online
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी भरती साठी अर्ज ऑनलाईन करायचा आहे, अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ सुरू केले आहे. त्याची लिंक वरती देण्यात आली आहे, तेथे ऑनलाईन अर्ज येथून Apply करा या लिंक वर क्लिक करून साइटला भेट द्या.
अधिकृत संकेतस्थळ ओपन झाल्यानंतर तुम्हाला भरतीचा फॉर्म ओपन करायचा आहे. त्यानंतर फॉर्म मध्ये आवश्यक ती सगळी माहिती लक्षपूर्वक भरायची आहे.
जाहिराती मध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून आवश्यक काळजी घेऊन अर्ज सादर करायचा आहे. फॉर्म भरताना जाहिराती मध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक ते सर्व कागदपत्रे अर्जामध्ये अपलोड करायचे आहेत.
वर सांगितल्या प्रमाणे ऑनलाईन परीक्षेसाठी फी देखील भरायची आहे. UR/EWS/OBC प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये फी भरायची आहे. आणि इतर सर्व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना फक्त 250 रुपये परीक्षा फी भरायची आहे.
परीक्षा फी भरणे आवश्यक आहे, कर्ण जे उमेदवार फी भरणार नाहीत त्यांचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. फी भरून झाल्यावर तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करा, म्हणजे तुमचा फॉर्म ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीतील करियर विभागाकडे सादर होईल.
OICL Bharti Online Exam
या भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात परीक्षा होणार आहे, त्यामुळे भरती साठी इच्छुक असणार्या उमेदवारांना कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप च्या मदतीने CBT Test Exam द्यायची आहे.
12 एप्रिल, 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, शेवटच्या तारखे पर्यंत जे उमेदवार अर्ज सादर करतील त्यांची परीक्षा ही लगेच एका महिन्याने घेतली जाणार आहे.
मे किंवा जून महिन्यात परीक्षा घेतली जाणार आहे, परीक्षेची तारीख तुम्हाला तुमच्या इमेल वर किंवा मोबाईल वर कळवली जाणार आहे, आणि जे उमेदवार या परीक्षेत पास होतील त्यांना लगेच पुढील आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून रिक्त जागांसाठी निवडले जाईल.
OICL Bharti FAQ
OICL Bharti ची अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे.
OICL Bharti साठी किती रिक्त जागा आहेत?
या भारतीसाठी एकूण 100 रिक्त जागा आहेत.
OICL Bharti साठी अर्ज कसा करायचा आहे?
अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन आहे.
OICL Bharti साठी अर्ज करण्याची तारीख कधीपासून सुरू होत आहे?
OICL Bharti साठी अर्ज करण्याची तारीख 21 मार्च 2024 पासून सुरू होत आहे.
हे वाचा:-
वाचा:- Thane Namo Job Fair 2024 | ४० हजार पदांच्या ठाणे नमो महारोजगार मेळावा
वाचा:- SSC Selection Posts Bharti 2024: 10 वी, 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! 2049 रिक्त जागा|
वाचा:- Dhule Jilha Parishad Bharti 2024 | जिल्हा परिषद भरती जाहिरात प्रसिद्ध! पात्रता: 12वी उत्तीर्ण
⚠️ महत्वाची सूचना: www.missionbharti.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.