India Post Office Bharti 2024
India Post Office Bharti 2024: भारतीय टपाल विभाग हे सातत्याने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत असतो. आताच प्रसिध्द झालेल्या अधिसूचनेनुसार पोस्ट विभागामध्ये ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) पदाची भरती (India Post Office Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना पोस्ट खात्याने जारी केली आहे.
ही भरती जम्मू काश्मीर सर्कलमध्ये केली जाणार आहे. यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने दिलेल्या पत्यावर अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज योग्य त्या कागदपत्रांसहित लिफाफ्यातून सहायक पोस्टमास्टर जनरल (भरती), 0/o मुख्य पोस्ट मास्टर जनरल, जम्मू-कश्मीर सर्कल, मेघदूत भवन, रेलहेड कॉम्प्लेक्स जम्मू – 180012 या पत्यावर पाठवायचे आहेत.
अर्ज कसा कराल?
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी इंडिया पोस्ट विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन भरती सेक्शन मधील अधिसुचना पाहावी. या अधिसूचनेतील अर्जाच्या नमुन्याची प्रिंट काडायची आहे आणि हा अर्ज भरून लिफाफ्यातून पाठवावा.
शैक्षणिक पात्रता –
पोस्ट ऑफिस भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांची शैक्षणिक योग्यता फक्त 10वी पास ठेवली आहे.
वेतन – निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 20200/- रुपये वेतन दिले जाईल.
PDF जाहिरात – Post Office Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
पोस्ट खात्याची मागच्या वेळेची जाहिरात खालील प्रमाणे:
10वी उत्तीर्ण उमेदवारांनी हि संधी सोडू नका. महिना 63 हजार पगार, पोस्ट खात्यात नोकरी|India Post Office Bharti 2024
भारतीय टपाल खाते सातत्याने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत असते. नुकत्याच प्रसिध्द झालेल्या अधिसूचनेनुसार पोस्ट विभाग अंतर्गत ड्रायव्हर पदाची भरती (India Post Office Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना पोस्ट विभागाने जारी केली आहे.
पोस्ट विभाग, दळणवळण मंत्रालयाची ही भरती प्रक्रिया उत्तर प्रदेश सर्कलमध्ये केली जाणार आहे. याठिकाणी अधिसूचनेनुसार ड्रायव्हर या पदासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाची हार्ड कॉपी पोस्ट ऑफिस मदे सबमिट करण्याची शेवटची तारीख 42 दिवस आहे, म्हणजे एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत असेल.
पोस्ट विभागातील उत्तर प्रदेश वर्तुळातील 78 ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केली जात आहे. या पदांसाठी पात्र उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे.
निवड प्रक्रिया – स्टेज 1 साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना स्टेज २ साठी उपस्थित राहावे लागेल. जे उमेदवार स्टेज २ च्या प्रत्येक पेपरमध्ये पात्र ठरतील त्यांना अंतिम गुणवत्ता यादीमध्ये उपस्थित राहावे लागेल.
इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज पोस्टाने खालील पत्त्यावर पाठवू शकतात:
व्यवस्थापक (GRA), मेल मोटर सेवा कानपूर, जीपीओ कंपाउंड, कानपूर- 208001 उत्तर प्रदेश.
PDF जाहिरात – Post Office Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
भारतीय टपाल विभाग अंतर्गत रिक्त पदाची मोठी भरती (इंडिया Post Office Bharti 2023) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 1899 रिक्त जागांसाठी ही भरती केली जात आहे. यावर्षी पुन्हा एकदा टपाल खात्याने ही मेगाभरतीची घोषणा केली आहे.
india Post Office Bharti 2023
या भरती अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 डिसेंबर 2023 आहे. ही भरती स्पोर्टस् कोट्या अंतर्गत केली जाणार आहे.
रिक्त पदांचा तपशील
पदाचे नाव | पद संख्या |
पोस्टल असिस्टंट | 598 पदे |
सॉर्टिंग असिस्टंट | 143 पदे |
पोस्टमन | 585 पदे |
मेल गार्ड | 03 पदे |
मल्टी टास्किंग स्टाफ | 570 पदे |
पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पोस्टल असिस्टंट | पदवी |
सॉर्टिंग असिस्टंट | पदवी |
पोस्टमन | 12वी |
मेल गार्ड | 12वी |
मल्टी टास्किंग स्टाफ | 10वी |
पदनिहाय वेतनश्रेणीचा तपशील खालील प्रमाणे
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
पोस्टल असिस्टंट | Rs. 25,500 – 81,100/- |
सॉर्टिंग असिस्टंट | Rs. 25,500 – 81,100/- |
पोस्टमन | Rs. 21,700 – 69,100/- |
मेल गार्ड | Rs. 21,700 – 69,100/- |
मल्टी टास्किंग स्टाफ | Rs. 18,000 – 56,900/- |
महत्वाच्या सूचना –
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 9 डिसेंबर 2023 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.