Dr. Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojana
Dr. Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojana: महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालन मंडळाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजने (Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojana) संबंधी सविस्तर अशी माहिती या लेखामध्ये मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना विध्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्षासाठी सुरू करण्यात आलेली आहे, त्यानुसार महाराष्ट्रातील पात्र विद्यार्थ्यांना वसतिगृह निर्वाह भत्ता दिला जात आहे. या योजने साठी कोण कोणते विध्यार्थी पात्र आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत.
तुम्हाला देखील शिक्षणासाठी शासनाच्या या पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता यौजनेतून शिष्यवृत्ती योजना चा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही कृपया या लेखामध्ये दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा. जेणेकरून तुम्हालाशिक्षणासाठी आर्थिक मदत होईल.
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना 2024
डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना ही गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्यांना वर्षातील एकूण 10 महिन्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे, म्हणजे केवळ शैक्षणिक कालावधी मध्येच ही योजना लागू असणार आहे आणि याचा लाभ विध्यार्थ्यांना घेता येणार आहे. 2,000 रुपये ते 30,000 रुपये एवढी स्कॉलरशिप विध्यार्थ्यांनामिळणार आहे.
यामध्ये Urban Areas, मेट्रो सिटी आणि ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील हि शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यामुळे योजनेचा फायदा घेण्याची संधी सर्वांना आहे, ही संधी सोडू नका, जेविध्यार्थी पात्र असतील, तर त्यांनी लगेच अर्ज करून टाका.
Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojana:
योजनेचे नाव: | डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना |
उद्देश: | विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे. |
फायदा: | 2,000 रुपये ते 30,000 रुपये एवढी आर्थिक सहाय्यता. |
अर्ज प्रक्रिया: | ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ: | महाराष्ट्र सरकारच MahaDBT Portal |
Panjabrao Deshmukh Nirvah Bhatta Yojana Qualification:
- अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी/नागरिक असायला पाहिजे.
- अर्जदार कोणत्याही प्रकार ची नोकरी करत नसावा.
- अर्जदार शासनाच्या इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा सध्या लाभ घेत नसावा.
- विद्यार्थी हा बाहेरगावी वसतिगृहात राहून शिक्षण घेत असावा. जर विद्यार्थी त्याच्या गावातील किंवा शहरातील वसतिगृहात राहून शिक्षण घेत असेल, तर असा विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र असणार नाही, त्याला निर्वाह भत्ता मिळणार नाही.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर विद्यार्थ्याला वसतिगृह निर्वाह भत्ता मिळेल.
- जरविद्यार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे 1 लाख ते 8 लाख दरम्यान असेल, तर अशा विद्यार्थ्यांना व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीमिळेल.
Panjabrao Deshmukh Nirvah Bhatta Yojana Benifits:
पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी 2,000 रुपये 30,000 एवढी आर्थिक सहाय्यता केली जाणार आहे, यामध्ये निर्वाह भत्ता आणि व्यवसायिक अभ्यासक्रम साठी मदत केली जाणार आहे.
खाली आपण शासनाद्वारे या योजनेसाठी आर्थिक मदत कशी दिली जाणार याची माहिती टेबल स्वरूपामधे दिली आहे. माहिती वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला किती रुपये मिळतील, हे समजून जाईल.
प्रकार | वार्षिक उत्पन्न मर्यादा | वसतिगृह ठिकाण | शिष्यवृत्ती रक्कम |
---|---|---|---|
नोंदणीकृत मजूर आणि अल्पभूधारक शेतकरी | कोणतीही मर्यादा नाही | मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि महानगर पालिका क्षेत्र | 30,000 रुपये |
इतर शहरे आणि ग्रामीण भागासाठी | 20,000 रुपये | ||
इतर विद्यार्थी | 1 लाख रुपये | मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि महानगर पालिका क्षेत्र | 10,000 रुपये |
इतर शहरे आणि ग्रामीण भागासाठी | 8,000 रुपये | ||
इतर विद्यार्थी | 1 लाख ते 8 लाख रुपये | मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि महानगर पालिका क्षेत्र | 10,000 रुपये |
इतर शहरे आणि ग्रामीण भागासाठी | 8,000 रुपये | ||
बिगर व्यवसायिक अभ्यासक्रम विद्यार्थी | 1 लाख रुपये | – | 2,000 रुपये |
पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता या योजने साठी खालील कागदपत्रे लागतील:
Panjabrao Deshmukh Nirvah Bhatta Yojana Document List
- अर्जदार विद्यार्थ्याचे आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र (महाराष्ट्र)
- कुटुंबाचे रेशनकार्ड
- गॅप असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (1 लाख ते 8 लाख)
- विद्यार्थ्याचे पालक शेतकरी असतील, तर अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र
- पालक मजूर असतील तर, नोंदणीकृत मजूर प्रमाणपत्र
- दोन मुले असल्याचे पालकांचे घोषणापत्र
वर सांगितलेली सर्व कागदपत्रे ऑनलाईन अर्ज करताना लागणार आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना ही आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणेगरजेचे आहे. या कागदपत्रा व्यतिरिक्त इतर काही कागदपत्रे देखील लागू शकतात, त्यामुळे तुम्ही एकदा MahaDBT पोर्टल वर जाऊन त्याची माहिती जाणून घ्या.
Panjabrao Deshmukh Nirvah Bhatta Yojana Application Form:
या योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी फॉर्म कसा भरायचा हि माहिती खाली दिलेली आहे, ती काळजीपूर्वक वाचा. आणि तुमचा स्कॉलरशिप फॉर्म भरून घ्या.
- सर्वप्रथम MahaDBT पोर्टल वर तुम्हाला जायचे आहे, या ठिकाणी दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत वेबसाईट वर जाऊ शकता.
- MahaDBT पोर्टल वर गेल्यानंतर सुरुवातीला तुमची नोंदणी करून घ्या, त्यांनतर Username, Password द्वारे Login करून घ्या.
- MahaDBT पोर्टल च्या Dashboard वर आल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला Aadhar Bank List check करून घ्यायचे आहे, जर तुमच्या बँकेला आधार लिंक असेल तर तुम्हाला काही पण करण्याची गरज नाही, आणि नसेल तर तुम्हाला बँकेत जाऊन बँक अकाउंट ला आधार लिंक करून घ्यायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमची Personal Information विचारली जाईल, ती तुम्हाला भरायची आहे. मग Address आणि Other Information देखील फॉर्म मध्ये टाकायची आहे.
- पुढे तुम्हाला तुमचे शैक्षणिक Qualification Details भरायची आहे, त्यांनतर तुम्ही ज्या वसतिगृहात राहत आहेत, त्या वसतिगृहाची पण माहिती भरायची आहे.
- त्यानंतर तुम्हाला मिळणाऱ्या शिष्यवृत्ती ची माहिती समोर येईल, तुम्हाला एकदा फॉर्म तपासून घ्यायचा आहे. त्यानंतर I Agree या बटणावर क्लिक करून submit करायचे आहे. शेवटी तुमचा Success चा मॅसेज येईल, अशाप्रकारे तुमचा फॉर्म ऑनलाईन भरला जाईल.
टीप: डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी फॉर्म Renew करावा लागतो. त्यामुळे फॉर्म चा Application ID Number नोंदवून ठेवा.
Panjabrao Deshmukh Nirvah Bhatta Yojana FAQ:
पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता या योजनेचा फायदा कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार?
महाराष्ट्र राज्यातील गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांना या पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा फायदा मिळणार आहे.
पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
ऑनलाईन स्वरूपात MahaDBT पोर्टल वरून पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना साठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. याची सविस्तर माहिती वरती या लेखामध्ये दिली आहे.
पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेद्वारे किती रुपये शिष्यवृत्ती मिळणार?
विद्यार्थांना वसतिगृहात राहण्यासाठी आणि शिक्षण घेण्यासाठी 2,000 ते 30,000 रुपये एवढी आर्थिक मदत केली जाणार आहे.