Police Bharti Document List
Police Bharti Document List: महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून आनंदाची बातमी म्हणजे पोलिस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत वाढली आहे. पोलिस भरतीची अर्ज करण्याची तारीख 15 एप्रिल पर्यंत वाढवली आहे.
त्यामुळे ज्या उमेदवारांनी अजूनही अर्ज भरलेले नसतील त्यांना आता अर्ज करण्याची संधी आहे. तर या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला पोलिस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज कसा कारायचा याची संपूर्ण माहिती दिली आहे. त्याचबरोबर पोलिस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे कोणती याचीही सविस्तर माहिती दिली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही माहिती खूप महत्वाची ठरणार आहे.
Police Bharti Document List –
पोलिस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे:
- उमेदवाराचे ओळखपत्र आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स
- अर्जदाराची दहावीची मार्कशीट
- अर्जदाराची बारावीची मार्कशीट
- उमेदवार पदवीधर असल्यास गुणपत्रक
- मुक्त विद्यापीठातून शिकत असल्यास गुणपत्रक
- पद्वित्तीर्ण पदवी असल्यास गुणपत्रक
- उमेदवाराने ITI/ डिप्लोमा केला असेल तर मार्कशीट
- शाळा सोडल्याचा दाखला TC
- शाळेत शिकत असल्यास बोनाफाईड प्रमाणपत्र
- कास्ट सर्टिफिकेट
- वयाचा पुरावा
- रहिवासी प्रमाणपत्र
- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आर्थिक दृष्ट्या मागास असल्यास EWS प्रमाणपत्र
- महिलांसाठी 30 टक्के आरक्षणाचे प्रमाणपत्र
- प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असल्यास प्रमाणपत्र
- अर्जदार खेळाडू असेल तर प्रमाणपत्र
- होमगार्ड प्रमाणपत्र
- वडील पोलीस असतील तर प्रमाणपत्र
- माजी सैनिक असतील तर डिस्चार्ज कार्ड ओळखपत्र
- माजी सैनिक असतील तर आर्मी एज्युकेशन प्रमाणपत्र
पोलिस भरतीची संपूर्ण माहिती पहा:
पोलिस भरतीसाठी एवढे कागदपत्रे लागणार आहेत,यात प्रत्यक्ष अर्ज करताना दुसरे कागदपत्रे लागू शकतात. त्यामुळे फ्रॉम भरताना सर्व कागदपत्रे जवळ ठेवा. आणि जे कागदपत्रे तुम्हाला भरतीसाठी लागतील ते सादर करा.
सगळे मिळून 22 वेगवेगळे कागदपत्रे डॉक्युमेंट पोलीस भरतीसाठी लागणार आहेत. यामधील काही कागदपत्रे हे पदानुसार आहेत, म्हणजे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाची कागदपत्रे तुम्हाला सादर करायचे आहेत.
(How To Apply) Police Bharti Online Form
1. प्रथम महाराष्ट्र पोलीस mahapolice.gov.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
2. पाहिल्याच पेजवरील भरती Recruitment या Option वर क्लिक करा, आवश्यक ती सर्व माहिती सुरुवातीला वाचून घ्या.
3. नंतर Apply Online या Link वर क्लिक करा, आता तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल.
4. त्या फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरून घ्या, कोणत्याही प्रकारची चूक करू नका.
5. त्यानंतर पुढे भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे जसे फोटो आणि सही सोबत इतर डॉक्युमेंट अपलोड करून घ्या.
6. परीक्षेसाठी ठरवण्यात आलेली फी भरून घ्या, फी साठी तुम्ही फॉर्म मध्ये दिलेले कोणतेही Payment Mode चा वापर करू शकता.
7. एकदा पोलीस भरतीचा फॉर्म तपासून घ्या, अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती योग्य आहे का याची खात्री करून घ्या.
8. शेवटी फॉर्म खाली दिलेल्या Submit या बटणावर क्लिक करा, अशा प्रकारे तुमचा पोलीस भरतीचा ऑनलाईन फॉर्म पूर्ण होईल.
हे पहा:
वाचा: CBSE Bharti 2024: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 12 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!!
Police Bharti FAQ
पोलिस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
पोलिस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.
पोलिस भरतीसाठी कोणत्या वेबसाइट वरुन ऑनलाइन अर्ज कारयाचा आहे?
पोलिस भरतीसाठी mahapolice.gov.i या वेबसाइट वरून फ्रॉम भरायचा आहे.
पोलिस भरतीसाठी किती कागदपत्रे लागणार आहेत?
पोलिस भरतीसाठी एकूण 22 गवेगळे कागदपत्रे लागणार आहेत. भरतीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे वरती दिली आहेत ते चेक करून घ्या.
⚠️ महत्वाची सूचना: www.missionbharti.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.