SECR Bharti 2024
SECR Bharti 2024: भारतीय दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अप्रेंटिस या रिक्त पदासाठी भरती निघाली आहे. रेल्वे विभागाने पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज कारायचा आहे.
ज्या उमेदवारांना रेल्वेत नोकरी करण्याची खूप इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही भरती एक सुवर्णसंधी आहे. आणि त्याचबरोबर एक विशेष बाब म्हणजे 10वी पास उमेदवार सुद्धा अर्ज करू शकणार आहेत. आणि हो 10 वी सोबत संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असणे देखील गरजेचं आहे.
जे उमेदवार दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती साठी अर्ज करणार आहेत त्यांना फ्रॉम भरण्यासाठी फी मध्ये 100% सूट देण्यात आली आहे. म्हणजे या भरतीसाठी कसल्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस या पदासाठी ही भरती राबवण्यात आली आहे. त्यामुळे जे उमेदवार अप्रेंटिस पदासाठी निवडले जातील त्यांना रेल्वेमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळणार नाही.
निवडलेल्या उमेदवारांना मर्यादित कलावधीसाठी अप्रेंटिस या पदावर ठेवण्यात येणार आहे. आणि नंतर जेव्हा उमेदवारांचा कार्यकाळ संपेल तेव्हा त्यांना पदावरून काढले जाईल.
उमेवारांना 1 वर्षासाठी रेल्वेत काम करता येईल कारण त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून निवडले जाणार आहे. या कालावधीमध्ये प्रशिक्षण कार्यकाळात रास्त पगार दिला जाणार आहे.
SECR Bharti 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, परीक्षा फी, पद संख्या, पगार, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज सुरू होण्याची तारीख 12 मार्च 2024 आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
SECR Bharti 2024
पदाचे नाव | अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) |
पद संख्या | 733 जागा |
शैक्षणिक पात्रता | 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण |
नोकरी ठिकाण | बिलासपूर विभाग (छत्तीसगड) |
पगार | 84,000 रुपये प्रति महिना (वेतन श्रेणी बदलू शकते) |
वयोमर्यादा | 15 ते 24 वर्षे |
परीक्षा फी | कोणतीही फी नाही |
वयोमर्यादा सूट | SC प्रवर्गातील उमेदवारांचे वय – 15 ते 29 वर्षे / 05 वर्षांची सूट ST प्रवर्गातील उमेदवारांचे वय – 15 ते 29 वर्षे / 05 वर्षांची सूट OBC प्रवर्गातील उमेदवारांचे वय – 15 ते 27 वर्षे / 03 वर्षांची सूट |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 12 मार्च 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 12 एप्रिल 2024 |
SECR Bharti 2024 Educational Qualification
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरतीसाठी रेल्वे विभागाद्वारे पात्रता निकष जारी केले आहेत. यामध्ये वर सांगितल्याप्रमाणे उमेदवार हा दहावी पास असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदार उमेदवाराने संबंधित ट्रेड मधून ITI कोर्स केलेला असणे देखील आवश्यक आहे.
- 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण
- संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण
ITI ट्रेड Wise Vacancy –
ITI ट्रेड | रिक्त जागा |
---|---|
Carpenter | 38 |
COPA (75 Divn.+25 HQ/Const) | 100 |
Draftsman (Civil) | 10 |
Electrician | 137 |
Elect. (Mech.) | 05 |
Fitter | 187 |
Machinist | 04 |
Painter | 42 |
Plumber | 25 |
Mech (RAC) | 15 |
SMW | 04 |
Steno (English) (12 Divn.+15 HQ/Const.) | 27 |
Steno (Hindi) (04 Divn.+ 15HQ/Const.) | 19 |
Diesel Mechanic | 12 |
Turner | 04 |
Welder | 18 |
Wireman | 80 |
Chemical Laboratory Assistant | 04 |
Digital Photographer (00 Divn.+ 02 HQ) | 02 |
Total | 733 |
SECR Bharti 2024 Important Links
अधिकृत संकेतस्थळ | येथे पहा |
जाहिरात | डाऊनलोड करा |
ऑनलाईन अर्ज | येथून करा |
Online Application Process –
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अप्रेंटिस या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत. अधिकृत वेबसाईटवरून उमेदवारांनी फ्रॉम भरायचा आहे. पोस्टद्वारे कोणत्याही स्वरूपाचे हार्ड कॉपी पाठवण्याची गरज नाही.
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत त्यांनी वर दिलेल्या ऑनलाइन अर्ज समोरील येथून अर्ज करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
फ्रॉममध्ये जी काही माहिती विचारली असेल ती संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरायची आहे. माहिती ही बरोबर असायला हवी, कोणत्याही स्वरूपाची चुकीची माहिती द्यायची नाही.
तुमचा फॉर्म भरून झाला की तुम्ही, रेल्वे अप्रेंटिस भरतीचा अर्ज सबमिट करू शकता. रेल्वे अप्रेंटिस भरतीसाठी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी घेतली जाणार नाही, त्यामुळे उमेदवारांना याचा फायदा होणार आहे. हे नक्की!
लक्षात घ्या: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटिस या पदाची भरती ही छत्तीसगड बिलासपूर विभगासाठी राबवली जात आहे, त्यामुळे देशातील सर्व पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. रेल्वे अप्रेंटिस भरती साठी महाराष्ट्रातील उमेदवार देखील ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.
SECR Bharti 2024 Selection Process
अप्रेंटिस या भरतीसाठी उमेदवाराची निवड मेरिट लिस्ट नुसार केली जाणार आहे, म्हणजे उमेदवारांना 10वी मध्ये आणि संबंधित ITI ट्रेड मध्ये किती मार्क मिळाले आहेत त्यानुसार लिस्ट लागणार आहे.
ज्या उमेदवारांची नावे क्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मेरिट लिस्ट मध्ये येतील, त्यांना अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी या पदासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागात नोकरीसाठी निवडले जाईल.
ज्या उमेदवारांची मेरिट लिस्ट लागली असेल त्या उमेदवारांची मेडिकल तपासणी केली जाईल. मेडिकल तपासणीमध्ये अपात्र झालेल्या उमेदवारांना अप्रेंटिस या रिक्त पदांसाठी निवडले जाणार नाही.
हे पण पहा:
वाचा: CBSE Bharti 2024: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 12 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!!
SECR Bharti 2024 FAQ
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे कोणत्या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे?
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.
SECR Bharti 2024 या भरतीसाठी कोणत्या पद्धतीने अर्ज करायचा आहे?
SECR Bharti 2024 या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
SECR Bharti 2024 या भरतीमध्ये किती पदांची रिक्त भरती घेतली जाणार आहे?
SECR Bharti 2024 या भरतीमध्ये 733 रिक्त पदांची भरती घेतली जाणार आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या भरतीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता काय आहे?
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मधून ITI कोर्स केलेला असणे गरजेचे आहे.
⚠️ महत्वाची सूचना: www.missionbharti.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.