MSCE Pune Scholarship Final Answer Key 2024 । पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर

MSCE Pune Scholarship Final Answer Key 2024

माहिती परिषदेच्या उपायुक्त अनुराधा ओक यांनी दिलेल्या माहिती नुसार महाराष्ट्र राज्य प्रतिक्षा परिषदेमार्फत दि. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता ५वी आणि इयत्ता ८वी परीक्षेची इयत्तानिहाय व पेपरनिहाय फायनल उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम उत्तरसूची परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या उत्तरसूचीवर १३ मार्चपर्यंत त्रुटी आणि आक्षेपाबाबत ऑनलाइन निवेदन मागवण्यात आले आहे. 

ऑनलाइनशिवाय इतर कोणत्याही प्रकारे प्राप्त त्रुटी किंवा आक्षेपाबाबत निवेदने पाठवली तर त्यांचा विचार केला जाणार नाही. दिलेल्या मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेण्यात येतील आणि अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.

शिष्यवृत्तीच्या अर्जातील माहितीत विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, लिंग अशा दुरुस्ती करण्यासाठीही १३ मार्चपर्यंत शाळांच्या लॉगिनमध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. हे अर्जही ऑनलाइन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. परीक्षेची उत्तरसूची https://www.mscepuppss.in आणि www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप परिषदेच्या संकेतस्थळावरून ऑनलाइनरीत्या  नोंदविता येणार आहे.

MSCE Pune Scholarship Answer Key: The Class V and VIII Scholarship examination answer sheet has been released by MSCE (Maharashtra State Examination Council). The exam took place on February 12, 2023. Go to either “www.mscepune.in” or “https://www.mscepuppss.in” for additional information regarding the answer sheet. To obtain the answer key, click the link below. Get the PDF here. The examination results will be published soon. Additional information is provided below.

PDF जाहिरात – येथे क्लिक करा

अंतिम उत्तरतालिका डाउनलोड करा – येथे क्लिक करा

मागील वर्षाची अपडेट

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 12 Feb 2023 या परीक्षेची Final Answer Key लवकरच प्रकाशित केली जाईल . तसेच येत्या काही दिवसांतच निकालही होणार असल्याने विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यंदा १२ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्यात शिष्यवृत्ती परीक्षा पार पडली आहे, त्यामुळे परीक्षेनंतरलवकरच  निकाल जारी केला जाईल.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिष्यवृत्ती परीक्षा 2023 ची अंतिम उत्तरसूची लवकरच प्रकाशित केली जाईल.

महत्वाच्या बाबी:-

  • या अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबत निवेदन परिषदेच्या ‘www.mscepune.in’ आणि ‘https://www.mscepuppss.in’ या संकेतस्थळावरुन ऑनलाइन स्वरूपात करता येणार आहे.
  • ऑनलाइन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर आणि शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये ‘ऑब्जेक्शन ऑन क्वेश्चन पेपर अँड आन्सर की’ या पर्यायात उपलब्ध करून दिली आहे.
  •  त्रुटी तसेच आक्षेपाबाबतचे ऑनलाइन निवेदन सादर करण्यासाठी २८ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
  • त्यानंतर त्रुटी तसेच आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.
  • ऑनलाइन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलव्दारे) प्राप्त त्रुटी तसेच आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही.
  • मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.
  • तसेच मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे परिषदेने सांगितले आहे.

ऑनलाइन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत दुरुस्तीबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात विद्यार्थ्याचे नाव, आडनाव. वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग इत्यादी दुरुस्ती करण्यासाठी देखील २८ ऑगस्टपर्यंत मुदत दिल्याचे, दराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

Leave a Comment